अकोले : पुढारी वृत्तसेवा : यश हे अंतिम नसते. अपयश हे कधी घातक नसते, मात्र हे दोन्ही खेळ खेळण्यासाठी धैर्य लागते, असे प्रतिपादन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले. सुगांव खुर्द येथील जि. प. प्रा. शाळेच्या सेमी इंग्रजी वर्ग, विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अमृतसागर दूध संघाचे संचालक दयानंद वैद्य होते. झरवाळ म्हणाले, जि. प. प्रा. शाळा सुगांव खुर्दचा 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानात तालुक्यात दुसरा क्रमांक आला, ही अभिनंदनाची बाब आहे.
यावेळी अगस्ति देवस्थानचे विश्वस्त दीपक महाराज देशमुख, रोटरीचे अध्यक्ष अमोल वैद्य, माजी सरपंच विष्णुपंत वैद्य, उपसरपंच डॉ. धनंजय वैद्य, बाजार समितीचे संचालक मारुती वैद्य, शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब दोरगे, केंद्र प्रमुख बाळासाहेब आरोटे, रोटरीचे सेक्रेटरी, प्रा. विद्याचंद्र सातपुते, उद्योजक भारत पिंगळे, मा. नगरसेविका शितल वैद्य, पं. स. माजी उपसभापती संतोष देशमुख, सचिन वैद्य, डॉ. साहेबराव वैद्य, बाळासाहेब वैद्य, योगेश वैद्य, उपाध्यक्ष रवींद्र वैद्य, अनिल पवार, माधुरी वैद्य, अश्विनी वैद्य, शकुंतला पवार, ललिता सोनवणे, राजश्री लेंडे, किरण वैद्य, मुख्याध्यापक एखंडे आदी उपस्थित होते. डॉ. साहेबराव वैद्य यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन लक्ष्मण वैद्य व विलास ढोले यांनी केले.
हेही वाचा