जळगावात महिला दिनानिमित्त हेल्मेट मोटर सायकल रॅली
जळगाव : महिला दिनानिमित्त जळगाव पोलीस दलातर्फे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त हेल्मेट मोटर सायकल रॅली काढण्यात आली. स्पर्धेला पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखवुन स्पर्धेची सुरुवात केली.
८ मार्च रोजी जागतिक महिला दिना निमित्त जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाकडुन महिला दिन सप्ताह साजरा केला जात आहे. सकाळी १० वाजता शहर वाहतुक शाखा, जळगाव येथून महिलांसांठी ३ किमी मोटर सायकल हेल्मेट रॅली काढण्यात आली. या रॅलीला सुरुवात शहर वाहतुक शाखा कार्यालय पासुन कोर्ट चौक, नेहरु चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, कोर्ट चौक मार्गे शहर वाहतुक शाखा कार्यालय येथे संपली. सदर रॅलीमधुन "बेटी बचाव- बेटी पढाव", "स्त्री शक्तीचा सन्मान", "मुलगी शिकवा-देश घडवा", "कौंटुबिक छळ हा अक्षम्य गुन्हा असे वेगवेगळ्या प्रकारे महिला सशक्तिकरणाचा संदेश देण्यात आला.
रॅलीमध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलातील महिला अधिकारी/अंमलदार, पोलीस कुटुंबिय व जळगाव शहरातील महिला वेगवेगळा पारंपारीक वेशभुषा करुन सहभाग नोंदविला. मोटर सायकल हेल्मेट रॅलीला अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप गावीत, पोलीस उप अधीक्षक (गृह) प्रमोद पवार, सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक जळगाव उपविभाग यांच्यासह इतर महिला अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. सदर रॅलीचे यशस्वीतेसाठी पोउपनिरी रेश्मा अवतारे व पोलीस वेल्फेअर टिम यांनी परीश्रम घेतले.
हेही वाचा :

