Jalgaon Crime : शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष दाखवून अकरा लाख 75 हजारांची फसवणूक | पुढारी

Jalgaon Crime : शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष दाखवून अकरा लाख 75 हजारांची फसवणूक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- पाचोरा येथील प्लॉट नंबर 23 बळीराम पाटील नगर गिरणा पंपिंग रोड पाचोरा येथे राहणारे विशाल इंगळे यांना कंपनीचे शेअर खरेदी केल्यास आर्थिक नफा मिळेल असे आमिष दाखवून त्यांची 11 लाख 75 हजार रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, 21 जानेवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2024 या काळात विशाल प्रकाश इंगळे राहणार चोपडा यांच्या मोबाईल क्रमांकावर दोन वेगवेगळ्या व्हाट्सअप क्रमांकावरून विशाल इंगळे यांच्या इंस्टाग्राम खात्यावर व व्हाट्सअप वर संपर्क साधून विविध कंपन्यांचे नाव घेऊन या कंपनीचे शेअर खरेदी केल्यास अधिक नफा मिळेल असे आमिष दाखवून एक ॲप रजिस्ट्रेशन करण्यास सांगून विशाल इंगळे यांच्या खात्यात वाढीव रक्कम दाखवून विशाल यांचा विश्वास संपादन करून 11 लाख 75 हजार रुपये ऑनलाईन स्वीकारून विशाल इंगळे यांना पैसे परत न करून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी जळगाव सायबर सेल मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पावणे दोन लाखाची चोरी

जळगाव : भुसावळ शहरातील वांजोळा रोड या भागात राहणाऱ्या महिलेच्या घरातून अज्ञात चोरट्याने एक लाख 72 हजार रुपये रोख रक्कम व सोन्याचे वस्तू घेऊन पसार झाले.

भुसावळ शहरातील वांजोळा रोड प्लॉट नंबर 37 प्रेरणा नगर येथे राहणाऱ्या चित्रा सोनार यांच्या घरात दरवाजाला लावलेले कुलूप कडी कोंडा तोडून आत शिरुन अज्ञात चोरट्यांनी दीड लाख रुपयांची रोख रक्कम, बारा हजार रुपये सोन्याची लक्ष्मीचे चिन्ह असलेले दोन नाणे असे एकूण 1 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल उमाकांत पाटील हे करीत आहे.

गावठी कट्टा, दोन जिवंत काडतूस जप्त

विना परवाना गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस बाळगल्या प्रकरणी एका  संशयितास ताब्यात घेऊनएमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार शारीरिक दुखापत करण्यासाठी वापरण्यात येणारे कोणतेही हत्यार वा वस्तू घेऊन फिरण्यास सक्त मनाई आहे. अशातही भुसावळ रोडवरील बस स्टॉपवर सार्वजनिक जागी (दि. 28) च्या सायंकाळी 6:45 वाजेच्या सुमारास हर्षद शेख हनीफ उर्फ अण्णा या 26 वर्ष वय असलेल्या युवकाला पिस्तूल व काडतूस बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेतले. त्याच्याकडून 35000 ची गावठी पिस्तूल व 1200 रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button