नांदगावात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी | पुढारी

नांदगावात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

नांदगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा –  नांदगाव तालुक्यात आज दुपारच्या सुमारास वादळवारे व विजेच्या कडकडाटासह बे मोसमी पावसाने हजेरी लावली. गारपीटही झाली. दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाची शेतात असलेला शेतमाल झाकण्यासाठी एकच तारांबळ उडाली होती.

तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी सायंकाळी पावसाने अल्पशी हजेरी देखील लावली होती.

परंतु आज मंगळवारी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाबरोबरच गारा देखील मोठ्या प्रमाणात पडल्या तसेच या पावसामुळे शेतात पाणी साचले होते.

हवेत गारवा

गेल्या काही दिवसांपासून, वातावरणात तापमानाची वाढ झाली होती. यामुळे उष्णतेत देखील वाढ झाली होती. पाऊस पडल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

हेही वाचा :

Back to top button