Film Terav : “तेरव” एकल महिलेच्या संघर्षावरील चित्रपट

संदीप पाठक
संदीप पाठक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : येत्या ८ मार्चला महिला दिनी महाराष्ट्रात 'तेरव' बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित आहे. दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले. विदर्भाच्या मातीतून असे चित्रपट यायला हवेत आणि आपल्या समस्या मांडल्या जायला हव्यात, असे यावेळी नितीन गडकरी म्हणाले. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी हा ट्रेलर लॉन्च झाला. याप्रसंगी चित्रपटाचे लेखक श्याम पेठकर, संगीतकार वीरेंद्र लाटणकर, अभिनेत्री नेहा दंडाळे, श्रद्धाताई तेलंग, देवेंद्र लुटे उपस्थित होते.

विदर्भ मराठवाडा खानदेश या कापूसपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होतात. हा एक अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि 'कॉटन सॉईल तंत्र' या विषयावर या संदर्भात काम होणे गरजेचे आहे; पण श्याम पेठकर यांनी याआधी 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या विषय अत्यंत परिणामकारक पद्धतीने मांडला होता आणि आता आगामी "तेरव" या चित्रपटातून त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील त्या शेतकऱ्याची मागे एकटी उरलेली पत्नी म्हणजे एकल महिला यांच्या संघर्षावर चित्रपट लिहून लढण्याची उर्मी देणारा चित्रपट निर्माण केलेला आहे.

नाट्यदिग्दर्शक हरीश इथापे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. हा चित्रपट पूर्णतः विदर्भाच्या भाषेत आणि ९०%च्या वर विदर्भीय कलावंत घेऊन करण्यात आलेला आहे. चित्रपटाचे छायांकन सुरेश देशमाने यांनी केले, असे श्याम पेठकर म्हणाले.

या चित्रपटात किरण खोजे, संदीप पाठक, किरण माने, नेहा दंडाळे या प्रस्थापित कलावंतांसह विदर्भातील मधुभैया जोशी, श्रद्धाताई तेलंग, प्रभाकर आंबोने, वत्सला पोलकमवार, प्रवीण इंगळे, देवेंद्र लुटे, यशवंत चोपडे, शर्वरी पेठकर, संहिता इथापे, वैदेही चौरे, दिलीप देवरणकर यांच्या भूमिका आहेत. वऱ्हाडी कवी दिवंगत शंकर बडे यांच्या कवितेला गाण्याचा साज देण्यात आलेला आहे. चित्रपटाचे थीम सॉंग ज्ञानेश वाकुडकर यांनी लिहिले आहे. आणखी दोन गाणी "तेरव" या नाटकात शाम पेठकर यांनी लिहिलेली चित्रपटात घेण्यात आलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news