जळगाव : चोपड्याच्या प्रशासकीय कामाला आता गतिमानता येईल : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : चोपड्याच्या प्रशासकीय कामाला आता गतिमानता येईल : पालकमंत्री गुलाबराव पाटील
Published on
Updated on

जळगाव : महसूल यंत्रणा गतिमान यंत्रणा म्हणून ओळखली जाते. आता चोपडा येथे अत्याधुनिक प्रशासकीय इमारत बांधल्यामुळे कामाला गती येईल. नव्या इमारतीत नवी कार्यसंस्कृती रुजवा असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी तालुका प्रशासनाला नव्या इमारतीसाठी शुभेच्छा देऊन आपले अनुभव सांगितले.

या इमारतीचे उदघाट्न  दि. 23 रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीसह माजी आमदार लताताई चंद्रकातजी सोनवणे, माजी आमदार चंद्रकांतजी सोनवणे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाला नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे उपस्थित होते.
या नुतन इमारत कार्यक्रमानिमित्त महसूल विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला. पोटखराब क्षेत्र वहिती लायक क्षेत्रात रूपांतर करण्याअंतर्गत प्रातिनिधीक स्वरुपात मौजे शेंदणी येथील . हसरत झगा ढीवर यांना पोटखराब क्षेत्र वहिती लायक करण्यात आल्याबाबत ७/१२ उतारा व फेरफार नोंदीचे वाटप पालकमंत्री व मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रकल्पासाठी विज वितरण कंपनीला भाडेपट्टयाने जमीन उपलब्ध करून देण्यात आली तशी नोंद घेतलेला 7/12 उपअभियंता, चोपडा ग्रामीण विज वितरण कंपनी यांना देण्यात आला. वनविभागाचा महत्वाकांक्षी प्रकल्प ७/१२ संगणकीकरण अंतर्गत ई चावडी योजना अंमलबजावणी सुरु केली असून आज प्रातिनिधीक स्वरूपात श्री अरूण माधवराव पाटील रा. वराड यांनी भोगवटदार वर्ग-२ जमीन भोगवटदार वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्याकामी अनर्जित रक्कम रूपये २५,६७८५०/- सरकार जमा केल्याबाबतची ऑनलाईन पावती देण्यात आली. आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृह बांधकामासाठी महसूल विभागांतर्गत चोपडा शिवारातील शासकीय जमिन उपलब्ध करुन देण्यात आल्याचा ७/१२ उतारा व फेरफार पत्रक सहायक प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल यांना देण्यात आले. यावेळी अनेक लाभार्थीना विविध लाभाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये आदीवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल यांच्यामार्फत वनहक्क कायदा अमंलबजावणी वैयक्तिक लाभार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते वनपट्टे देण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चोपडयाचे उपविभागीय अधिकारी एकनाथ बंगाळे यांनी केले. चोपडयाचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news