Jalgaon Crime News : पेट्रोलपंप मॅनेजरला मारहाण करुन लुटणारा पोलिसांच्या जाळ्यात | पुढारी

Jalgaon Crime News : पेट्रोलपंप मॅनेजरला मारहाण करुन लुटणारा पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव- जामनेर तालुक्यातील शपुर येथील पेट्रोल पंप मॅनेजरला तीन अज्ञात लोकांनी मारहाण करुन त्यांच्याजवळून एक लाख 96 हजार रुपयांची कॅश घेऊन पसार झाले होते. त्यामधील एका संशयितास एमआयडीसी पोलिसांनी जळगावातून ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि. १८) रोजी सायंकाळी, ०७.०० वाजेच्या सुमारास निलेश रतन पावार रा. जामनेर पुरा हे त्रीवेनी पेट्रोलपंप शपुर येथून मोटार सायकलने जामनेरकडे येत होते. जामनेर ते शापुर रोडवरील बेल फाट्याजवळ लाल रंगाच्या मोटर सायकलवर तीन अनोळखी व्यक्तींनी मोटार सायकल आडवी लावून निलेश पवार यांना मारहाण करुन त्यांच्या बॅगेत असलेले १ लाख ९६ हजार ५०० रुपये घेवून पळुन गेले. म्हणून पेट्रोलपंप मॅनेजर निलेश रतन पवार यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन जामनेर पोलिस स्थानकात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर,  ही जबरी चोरी कुसुबां येथील एकाने केली असल्या बाबतची माहिती एम.आय.डीसी पोलीसांना मिळाली.  त्यानुसार एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी बबन आव्हाड, पो. उपनिरी, दत्तात्रय पोटे, दिपक जगदाळे, अतुल वंजारी, पो.ना. सुधीर साळवे, पोना सचिन पाटील, पोना किशोर पाटील, नाकों राहुल रगडे विशाल कोळी, पोकॉ ललीत नारखेडे, मापोकों राजश्री बावीस्कर यांनी कुसुबा येथुन रुशिकेश रमेश मावळे रा. साई सिटी कुसुबा यास ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी दरम्यान सदर गुन्हयाची माहिती मिळाली व गुन्हयातील वापरलेली मोटार सायकल मिळाली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. त्यास पुढील कारवाईसाठी जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button