नाशिक : अंबड पोलीस स्टेशनचे हवालदार सोनवणे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

नाशिक : अंबड पोलीस स्टेशनचे हवालदार सोनवणे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
Published on
Updated on

सिडको : पुढारी वृत्तसेवा- अंबड पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी सचिन सोनवणे (४६ ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

मंगळवारी कर्तव्यावर असताना दुपारी अचानक सोनवणे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असताना त्यांना पुन्हा हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यातच निधन झाले. सचिन सोनवणे यांनी निष्ठेने आपले कर्तव्य बजावताना परिसरातील नागरिक तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत अतिशय जिव्हाळ्याचे संबंध जोडले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, अंबडचे पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर आदींनी रुग्णालयात धाव घेत त्यांच्या परिवाराला धीर दिला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news