अमित शाह यांचा जळगाव दौरा रद्द | पुढारी

अमित शाह यांचा जळगाव दौरा रद्द

जळगाव ; गृहमंत्री अमित शहा यांचा 15 फेब्रुवारी रोजी जळगाव येथे युवा संवाद दौरा होता. हा दौरा काही कारणास्तव रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, दौरा कोणत्या कारणाने रद्द झाला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गुरुवारी (दि. १५) जळगाव शहरातील सागर पार्क येथे युवा सभेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होते. या अनुषंगाने गिरीश महाजन, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर व अन्य भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सभेच्या नियोजन संदर्भात भाजप कार्यालयात बैठक घेतली होती. तसेच (दि. 12) रोजी त्यांनी सागर पार्क येथे जाऊन सभेच्या जागेची पाहणी केली होती. दरम्यान अमित शहांचा युवा संवाद दौरा काही कारणास्तव रद्द करण्यात आल्याचे समोर आले आहे. पुढील दौरा हा लवकरच कळविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा :

Back to top button