Dhule News : खर्टीपाडा शाळा इमारत बांधकामाला विरोध

Dhule News : खर्टीपाडा शाळा इमारत बांधकामाला विरोध

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा-साक्री तालुक्यातील काकर्दे ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या खर्टीपाडा येथील जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत जुन्या इमारतीजवळ बांधण्याची मागणी असतानाही ग्रामपंचायतीने नवीन जागेत बांधकाम सुरू केले. त्यास ग्रामस्थांनी विरोध केला असून या कामाला स्थगिती मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

काकर्दे ग्रामपंचायतमधील खर्डीपाडा-१ , खर्टीपाडा- २ असे दोन पाडे आहेत. खर्टीपाडा- १ येथे १ सप्टेंबर १९७३ रोजी जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली होती. तेथे सध्या पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. शाळेत २१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु, शाळेचे दरवाजे, खिडक्या कमकुवत झाल्या आहेत. तेव्हा गावासाठी नवीन शाळा मंजूर झाली आहे. तिचे बांधकाम जुन्या शाळेजवळ करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. परंतु, त्यास खर्टीपाडा-२ मधील ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

खर्डीपाडा -१ मधील जुन्या शाळेजवळ शासकीय व शैक्षणिक कामकाज सुरू आहेत. २००६ मध्ये नवीन खोली मंजूर झाली होती. तरी ती इमारत जुनी इमारतपासून एक किलोमीटर अंतरावर बांधली होती. त्या इमारतीत एकही दिवस शासकीय कामकाज झाले नाही. याबाबत दि.२० डिसेंबर २०२३ रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. शाळेची वाटणी जुन्या इमारतीजवळ नवीन इमारत बांधण्यासाठी केंद्रप्रमुखांनी आश्वासन दिले होते. परंतू, हे काम अद्याप रखडले आहे. दुसरीकडे ग्रामपंचायत प्रशासनाने नवीन जागेवर शाळा इमारतीचे काम सुरु केले होते. परंतु, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व प्रशासकीय अडचणी निर्माण होईल, यामुळे नवीन इमारत ही जुन्या इमारतीपासून जवळ बांधावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी धाकल्या चौधरी, मोतीराम साबळे, राजेंद्र गवळी, मोतीराम पवार, मधुर चौधरी, अशोक चौधरी, रमण गायकवाड, चंदु चौधरी, योगेश राऊत, धनाजी चौधरी, अरुण बागुल, रविन भोये आदी उपस्थित होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news