Dhule News : सामोडे'तील 29 वर्षीय महिलेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ | पुढारी

Dhule News : सामोडे'तील 29 वर्षीय महिलेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा– साक्री तालुक्यातील सामोडे येथील विवाहित महिला मनीषा प्रवीण भदाणे (वय 29) यांचा विहिरीत मृतदेह तरंगताना आढळून आल्याने खळबल उडाली आहे. ही घटना दुपारी उघडकीस आली.

साक्री तालुक्यातील सामोडे येथील मनीषा भदाणे यांचा शोध सुरू होता. अशातच सामोडे गावातील एका शेतात असलेल्या विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही घटना उघडकीस येताच नातेवाईकांनी शेतात धाव घेतली. तिचे शव बाहेर काढून खासगी वाहनाने पिंपळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात सायंकाळी 5.30 वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि जयेश खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेवाळे करीत आहे. दरम्यान हा घातपात आहे की आत्महत्या हे स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा :

Back to top button