Nashik News | सेंद्रिय शेती तंत्रज्ञान अभ्यासासाठी दिल्लीत प्रशिक्षण

Nashik News | सेंद्रिय शेती तंत्रज्ञान अभ्यासासाठी दिल्लीत प्रशिक्षण
Published on
Updated on

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सेंद्रिय व नैसर्गिक शेती अभ्यासासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ATMA) कृषी विभागामार्फत नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक अँड नॅचरल फार्मिंग (एनपीओएफ National Centre for Organic and Natural Farming) गाजियाबाद, उत्तर प्रदेश तसेच बुलंद शहर येथील भारतभूषण त्यागी फार्म्स दिल्ली येथे सात दिवसीय आंतरराज्य शेतकरी प्रशिक्षण झाले. प्रशिक्षण कार्यक्रमात इगतपुरी व सिन्नर तालुक्यांतील ४५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

आत्मा नाशिकचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, प्रकल्प उपसंचालक वंदना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेती आदी विविध प्रकारची माहिती घेतली. सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील नैसर्गिक सेंद्रिय शेती योजनेतील शेतकऱ्यांची निवड करून सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नीलेश चौधरी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हितेंद्र मोरे इगतपुरी यांनी केले होते. सेंद्रिय शेती करणारे सिन्नर तालुक्यातील शेतकरी सुनील भिसे, रघुनाथ आव्हाड, गंगाधर भालेराव, दत्तात्रय शिंदे, संजय शिंदे, संदीप सांगळे, इगतपुरीचे शेतकरी दशरथ भवारी, बबन बांबळे, रामदास भवारी, राधेकृष्ण धादवड, संजय बांबळे अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले.

'आत्मा'कडून जिल्हाभरात शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहे. त्या गटातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी शेतकऱ्यांचा आत्मा योजनाअंतर्गत अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येते. – राजेंद्र निकम, प्रकल्प संचालक आत्मा नाशिक.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news