गुजरात अमली पदार्थ विरोधी पथकाची जळगाव जिल्ह्यात कारवाई | पुढारी

गुजरात अमली पदार्थ विरोधी पथकाची जळगाव जिल्ह्यात कारवाई

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

सुरत येथील ड्रग तस्कर संशयीताचा गुजरात राज्यापासून पाठलाग करत असलेल्या गुजरातच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) जळगाव जिल्ह्यातील यावल भुसावळ रस्त्यावर कारवाई करून पकडले आहे. मात्र त्याच्याबरोबरची तीन साथीदार हे पसार होण्यात यशस्वी झाले. आरोपी कडून एक पिस्तूल व काही साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. संशयित आरोपीला गुजरात मधील सुरत येथील दिंडोली पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

गुजरात राज्यामधील अमली पदार्थ विरोधी पथक हा सुरत येथील संशयित मोबीन शहा याचा पाठलाग करीत होते. संशयित आरोपी मोबीन शाह जी जे 05 आर एम 84 80 या  चारचाकी वाहनाने यावल तालुक्यात आला होता. गुजरात पथक त्याच्या मार्गावर असताना यावल भुसावळ रस्त्यावरील घोडे पीर बाबा दर्गा जवळ तो असल्याची माहिती गुजरात पोलिसांना मिळाली. रविवारी, दि.4 सायंकाळी साडेपाच वाजता गुजरात पोलिसांनी मोबीन शहाला अटक केली. त्याच्यासोबत असलेले तीन साथीदार मात्र पसार झाले आहेत. संशयित आरोपी मोबीन शहा याच्याकडून एक पिस्तूल व इतर काही वस्तू जप्त केल्या आहेत. या घटनेची माहिती यावल पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे सहाय्यक फौजदार असलम खान हवालदार भूषण चव्हाण मुस्तफा तडवी हे घटनास्थळी दाखल झाले. गुजरात अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडलेला आरोपी हा ड्रग्स तस्कर असल्याची माहिती पथकाने सांगितली व तो फरार असल्याची माहिती दिली.

हेही वाचा:

Back to top button