Heena Gavit : संसदेतील जोरदार भाषणाने खासदार डॉ. हिना गावित पुन्हा चर्चेत | पुढारी

Heena Gavit : संसदेतील जोरदार भाषणाने खासदार डॉ. हिना गावित पुन्हा चर्चेत

नंदुरबार – अर्थसंकल्पीय विशेष अधिवेशनात अर्थसंकल्पावर दमदार बॅटिंग करणारे भाषण करीत नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. हिना गावित यांनी समस्त खानदेश वाशीयांचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रवासीयांचे मन जिंकून घेतले. महिला खासदार म्हणून मोदी सरकारने संसदेत पहिले अभिनंदनपर भाषण करण्याचा सन्मान नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांना दिला, ही यातील सर्वात लक्ष वेधून घेणारी महत्वाची बाब ठरली.

आदिवासी जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागातील आदिवासींचे यशस्वीपणे प्रतिनिधित्व करणाऱ्या महा संसद रत्न खासदार डॉ. हिना गावित यांनी संसदेत आज पुन्हा प्रभावी भाषण केले याबद्दल दस्तुरखुद्द देशाचे संरक्षण मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह, स्मृती इराणी व अन्य सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सभागृहातच खासदार डॉ. हिना गावित यांचे विशेष अभिनंदन केले.

भारताच्या केंद्रीय सरकारने म्हणजे मोदी सरकारने महिला शेतकरी युवक आणि उद्योजकता याला अनुषंगून विकास योजना राबवताना देशातील समस्त महिला आणि आदिवासी समूह आत्मनिर्भर बनवणारे कसे विशेष कार्य केले याचे सुंदर विवेचन खासदार डॉ. हिना गावित यांच्या भाषणातून मांडले.

हेही वाचा :

Back to top button