Nashik News : केंद्र, राज्यसरकार विरोधात देवळ्यात राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन   | पुढारी

Nashik News : केंद्र, राज्यसरकार विरोधात देवळ्यात राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन  

देवळा ; पुढारी वृत्तसेवा- ईडी सीबीआयद्वारे विरोधकांवर दडपशाही करणाऱ्यात येत असल्याचा आरोप करुन राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात देवळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) वतीने तहसीलदार विजय सूर्यवंशी व पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे यांना गुरुवारी ( दि. १) रोजी निवेदन देण्यात आले.

राज्य व केंद्र सरकार हे ईडी व सीबीआयच्या कारवाया करुन लोकशाही दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत.  महागाई, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, शेती मालाची दुरावस्था हे सगळे मूळ मुद्दे बाजूला सारून अनावश्यक बाबींवर प्रभाव टाकून लोकशाही दडपण्यात येत आहे. महाराष्ट्रातील उत्तम काम करणाऱ्या नेत्यांची व लोकप्रतिनिधींची ईडी व सीबीआयच्या नावाखाली तोंडदाबनी करण्यात येत आहे. असा आरोप करुन राज्यकर्त्यांनी जनतेच्या हिताची कामे करावी असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष पंडित निकम, जि.प.च्या माजी सभापती उषा बच्छाव, नगरसेविका ऐश्वर्या आहेर, जितेंद्र आव्हाड, युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, डॉ. संजय निकम, शहर अध्यक्ष दिलीप पाटील, शेतकी संघाचे संचालक रवींद्र जाधव, यश निकम, यशवंत देवरे, मयूर सोनवणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button