धाराशिव: उमरगा येथे ओबीसी आरक्षण बचाव समितीचा मोर्चा | पुढारी

धाराशिव: उमरगा येथे ओबीसी आरक्षण बचाव समितीचा मोर्चा

उमरगा, पुढारी वृत्तसेवा: उमरगा येथे ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने आज (दि१) सकाळी तहसील व उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. हुतात्मा स्मारकापासून निघालेल्या या मोर्चात मसनजोगी व पोचाम्मा समाज बांधव पारंपरिक वेशभुषेत सहभागी झाले होते. ढोल- ताशांचा गजर, एकच पर्व ओबीसी सर्व, जो ओबीसी की बात करेगा, वही देश पर राज करेगा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.बुरबुर पोचाम्मा, मसन जोगी समाज व पोतराज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी ओबीसी समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणासंदर्भात “सगेसोयरे” या शब्दाची व्याख्या बदलून २६ जानेवारी २०२४ अधिसूचनेचा मसूदा रद्द करण्यात यावा, राज्य मागासवर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी, तसेच चुकीच्या कार्यपध्दतीने व बेकायदेशीररित्या वितरीत होणाऱ्या मराठा – कुणबी किंवा कुणबी – मराठा प्रमाणपत्रांचे वितरणाला स्थगिती देण्यात यावी. राज्यातील गोरगरीब ओबीसी, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण वाचवावे, आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या संपर्क कार्यालयात देण्यात आले.

हेही वाचा 

Back to top button