Nashik News : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर | पुढारी

Nashik News : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर

नाशिक, पुढारी वृत्तसेवा; येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या गोदावरी गौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्ञान क्षेत्रात हा पुरस्कार यंदा विवेक सावंत यांना जाहीर झाला आहे. तर, नृत्य विभागात सुचेता चापेकर, क्रीडा क्षेत्रात सुनंदन लेले, लोकसेवा शमसुद्दिन तांबोळी, चित्रपट विभागातून दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना तर चित्र विभागात प्रमोद कांबळे यांच्या नावाची घोषणा या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दर दोन वर्षांनी गोदावरी गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येत असतो. यावर्षी हा सोहळा कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी रविवारी 10 मार्चला कॉलेज रोडवरील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये होणार असून प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. 21 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.  प्रतिष्ठानतर्फे  मंगळवारी (दि.३०) झालेल्या पत्रकारपरिषदेत यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

Back to top button