Jalgaon Crime : जिल्ह्यात पावणे दोन लाखांचे सोने, मोटरसायकल चोरीला | पुढारी

Jalgaon Crime : जिल्ह्यात पावणे दोन लाखांचे सोने, मोटरसायकल चोरीला

जळगाव : जिल्ह्यात अज्ञात चोरट्यांनी पावणे दोन लाखांचे सोने आणि मोटरसायकल चोरी केल्या आहेत. जळगाव शहरातील हनुमान कॉलनी येथे राहणाऱ्या रुची काबरा यांच्या गळ्यातील 74 हजार रुपयांच्या मनी मंगळसूत्राची चोरी झाली. दोन अज्ञात इसमानी मोटरसायकलवर आलेल्या चोरट्यांनी ही चोरी केली.

अमळनेर शहरातील भद्रा प्रतीक मलजवळील कपिल आश्रम शिखर लायब्ररी जवळ विशाल सोनवणे यांनी उभी केलेली दहा हजार रुपयांची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली. जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमधील नवे रायपुर येथील गोविंद जाधव यांच्या घरासमोरून 30 हजार रुपयांची बजाज पल्सर मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी लांबवली. चाळीसगाव शहरातील साईबाबा मंदिर रिंग रोड पाटील वाडा येथून 20 हजार रुपयांची होंडा कंपनीची मोटरसायकल आणि शहरातील बामोशी बाबा दर्गा जवळील गुरवली येथील प्रदीप देशमुख यांच्या घरासमोरून पूनमचंद सोनवणे यांची तीस हजार रुपयांची एच एफ डिलक्स मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी लांबवली.

धरणगाव येथील बापू महाजन परिहार नगर येथून वीस हजार रुपयांची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या सर्व चोऱ्यांबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी चोरांचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा :

Back to top button