Nashik News : रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; प्रवाशास लॅपटॉप, बॅग परत

Nashik News : रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; प्रवाशास लॅपटॉप, बॅग परत

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- प्रवासी विसरलेला लॅपटॉप असलेली बॅग परत करणारे रिक्षाचालक रामेश्वर महाजन यांचा आडगाव पोलिसांनी सत्कार केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

महाजन हे सीबीएस ते आडगाव या मार्गावर रिक्षा (एमएच १५ जेए १९६७) चालवितात. रविवारी (दि. २८) सुमित खरोले (रा. पोलिस वसाहत, भारांबेनगर) हे रामेश्वर यांच्या रिक्षातून मुंबई-आग्रा महामार्गावरील भारांबेनगर येथे जाण्यासाठी बसले होते. मात्र ते त्यांची लॅपटॉप व बॅग रिक्षातच विसरले होते. ही बॅग महाजन यांनी आडगाव पोलिस ठाण्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक जाधव यांच्याकडे जमा केली. बॅग तपासली असता, त्यात सुमित खरोले यांचा मोबाइल क्रमांक मिळून आला. त्यावर संपर्क साधून त्यांना बोलावून घेण्यात आले. एकूणच खात्री झाल्यानंतर त्यांच्या ताब्यात देण्यात आली.

यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक शिंदे, अश्विनी पाटील, पोलिस उपनिरीक्षक जाधव, सहायक पोलिस उपनिरीक्षक जाधव, पोलिस हवालदास नरवडे, आव्हाड, काटकर, पोलिस नाईक महाजन, पोलिस अंमलदार सचिन बहिकर यांनी रिक्षाचालक रामेश्वर महाजन यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news