पुढारी विशेष : दुग्धजन्य पदार्थ निर्यातीत ४२ टक्के घट

पुढारी विशेष : दुग्धजन्य पदार्थ निर्यातीत ४२ टक्के घट
Published on
Updated on

दूध उत्पादनांत भारताने आपले प्रथम स्थान कायम ठेवले आहे. मात्र, आता दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. देशातून एप्रिल 23 ते ऑक्टोबर 23 या कालावधीत २९,२६४ मेट्रिक टन दुग्धजन्य पदार्थांची निर्यात होऊन देशाला १,०५७ कोटींचे परकीय चलन मिळाले. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत दुग्धजन्य पदार्थ निर्यातीत ४२ टक्क्यांची घट झाल्याचे दिसत आहे. एप्रिल २२ ते ऑक्टोबर २२ मध्ये देशातून ४६,३१३ मेट्रिक टन दुग्धजन्य पदार्थांची निर्यात होऊन, देशाला १,५१० कोटींचे परकीय चलन मिळाले.

सद्यस्थितीमध्ये जगातील एकूण दूध उत्पादनापैकी भारतात जवळपास एक चतुर्थांश दूध उत्पादन होत आहे. अशाच पद्धतीने भारतात दूध उत्पादन वाढत राहिल्यास पुढील १० वर्षांमध्ये जगाच्या ३० ते ३५ टक्के उत्पादन हे एकट्या भारतात होईल. त्यामुळे दूध आणि त्यापासून तयार केलेल्या पदार्थांची मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे. जर देशामध्ये वाढीव दूध उत्पादन होत असेल, तर ते चांगलेच आहे. मात्र त्याचा अतिरेक होऊन ते वाया जाऊ नये, यासाठी निर्यातीवर लक्ष केंद्रित करण्याची नितांत गरज आहे. यंदा लोकसभा निवडणुका होणार आहेत. महागाईचा फटका बसू नये म्हणून सरकारने कांदा, गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. या खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात निर्यात भारत करत होता. शेतीशी निगडित असलेला दुग्धजन्य व्यवसायही सरकारच्या बंदीतून सुटलेला नसल्याचे दिसत आहे.

वास्तविक शेतकऱ्यांना सध्याचे मिळणारे दुधाचे दर हे अत्यंत कमी आणि न परवडणारे आहेत. त्यावर सरकारला अनुदान सुरू करावे लागले. मात्र बाजारात सामान्य ग्राहकांना मिळणारे दुधाचे दर हे खूप अधिक आहेत. त्यामुळे या व्यवसायात वाढलेली नफेखोरी त्याचप्रमाणे लम्पीसारख्या आजाराने घटलेले दूध उत्पादन या सर्व बाबी निर्यातीस मारक ठरत आहे.

निर्यातीपेक्षा जास्त पैसा देशांतर्गत बाजारपेठेतून निघत असल्याने निर्यात कमी झाली आहे. आपल्या देशातील एकूण दूध उत्पादनापैकी जवळपास 60 ते 70 टक्के दूध बनावट आहे. हे बनावट दूध बंद केले, तर देशांतर्गत दुधाचे दर मोठ्या प्रमाणात वाढतील आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. -सचिन होळकर, कृषितज्ज्ञ, लासलगाव.

पाच वर्षांतील निर्यातीची आकडेवारी
सन २०१७-१८ – ११९६ कोटी रुपये
सन २०१८-१९ -२४२३ कोटी रुपये
सन २०१९-२० -१३४१ कोटी रुपये
सन २०२०-२१- १४९१ कोटी रुपये
सन २०२१-२२- २९२८ कोटी रुपये
सन २०२२-२३- २२६९ कोटी रुपये

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news