

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनात जय बाबाजी भक्त परिवारही सहभागी होणार आहे. नाशिक सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कमिटीने स्वामी शांतिगिरी महाराज यांची भेट घेऊन, मुंबईतील आंदोलनात जय बाबाजी परिवाराने सहभागी होण्याबाबत चर्चा केली.
त्यावर शांतिगिरी महाराजांनी सांगितले की, मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला जय बाबाजी परिवार सहकार्य करेल. मराठा आरक्षणाचा लढा न्यायिक मार्गाने असल्यामुळे त्याला नक्कीच यश मिळेल. यावेळी शांतिगिरी महाराजांचे शिष्य विष्णू महाराज यांनी मराठा आरक्षणासाठी लागणाऱ्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी मदत केली. यावेळी शिष्टमंडळाने शांतिगिरी महाराजांचे आशीर्वाद घेऊन ऋण व्यक्त केले. याप्रसंगी सुनील बागूल, चंद्रकांत बनकर, करण गायकर, नानासाहेब बच्छाव, राजू देसले, योगेश नाटकर, सोमनाथ जाधव, वैभव दळवी, हर्षल पवार, विक्रांत देशमुख, संदीप कुठे, राम निकम, हार्दिक निगळ आदी उपस्थित होते.
मराठा आरक्षण मिळावे, यासाठी सकल क्रांती मोर्चाच्या वतीने समाजातील विविध घटकांच्या गाठीभेटी घेऊन, मोर्चाला बळ द्यावे, अशी मागणी केली जात आहे. जय बाबाजी परिवाराचे स्वामी शांतिगिरी महाराजांच्या अनुयायांनी लढ्यात सहभागी होण्याची मागणी केली असता, त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आमच्या लढ्याला बळ मिळाले आहे. – करण गायकर, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा
हेही वाचा :