Jalgaon Accident : भुसावळात चारचाकी दुभाजकावर आदळल्याने चालकाचा मृत्यू | पुढारी

Jalgaon Accident : भुसावळात चारचाकी दुभाजकावर आदळल्याने चालकाचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथे बुधवार (दि. १७) सकाळी ४ वाजेच्या सुमारास चारचाकी दुभाजकावर आदळल्याने वाहन चालकाचा मृत्यू झाला.

भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथे केंद्रात कामाला असलेला देवेंद्र जालंदर पवार (वय २१) हा बुधवारी पहाटे ४ वाजता बालेरो वाहन क्रमांक एम एच १९ सी वाय ९६१६ ने भुसावळ येथून दिपनगर येथे जाण्यासाठी निघाला होता. दिपनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ चालक देवेंद्र पवार याचा वाहनावरील ताबा सुटल्याने दुभाजकावर आदळले. या अपघातात देवेंद्रच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत झाली.

तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती देवेंद्र पवार याला मयत घोषित केले. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button