Latest
Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिरात आज पुरुषांना एक तास प्रवेशबंदी
तुळजापूर : पुढारी वृत्तसेवा : मकर संक्रांतीनिमित्त सोमवारी (दि. १५) सायं. ५ ते ६ यावेळेत पुरुष भाविकांना तुळजाभवानी मातेच्या मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. हा नियम सर्व सेवेकरी, पुजारी तसेच भाविकांनाही लागू राहील. (Tuljabhavani Temple)
तुळजापुरात श्री तुळजाभवानी मातेला वानवसा करण्यासाठी मंदिरात महिलांची गर्दी उसळत असल्याने मंदिर प्रशासनाने एक तासासाठी पुरुषांना मंदिर प्रवेशबंदीचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. तहसीलदार तथा मंदिराचे प्रशासन अधिकारी सोमनाथ माळी यांनी हे पत्रक जारी केले आहे. सध्या श्री तुळजाभवानी मातेचा निद्राकाळ सुरू असला तरी भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत आहे आणि मकर संक्रांतीदिवशी बहुसंख्य महिला मातेला मातेकडे अखंड सौभाग्याचे दान मागतात. त्यासाठी संक्रांतीदिनी त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

