जळगाव : पिळोदा येथे लग्न लावून देत नसल्याच्या कारणावरून वडिलांचा खून; मुलाला अटक

जळगाव : पिळोदा येथे लग्न लावून देत नसल्याच्या कारणावरून वडिलांचा खून; मुलाला अटक
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा :  लग्न लावून देत नसल्याच्या कारणावरून मुलाने वडिलाचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. ही घटना रविवारी (दि.१४) रात्री ११ च्या सुमारास  पिळोदा (ता. यावल) येथे घडली. या प्रकरणी  पोलिसांनी संशयित मुलाला अटक केली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पिळोदा गावात खळबळ उडाली आहे. Jalgaon

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील पिळोदा येथे रतन कोळी व पत्नी शोबाबाई कोळी आणि मुलगा देवानंद कोळी राहतात. माझे लग्न लावून देत नाही, किंवा लग्नासाठी पैसे देत नाही. या कारणावरून देवानंद याने वडिलांशी वाद घातला. याकडे वडिलांनी दुर्लक्ष केले. या रागातून संतापाच्या भरात रविवारी (दि. १४) रात्री ११ वाजता घरी झोपलेले असताना देवानंद याने लोखंडी कुऱ्हाडीने झोपलेल्या वडिलांवर वार करून खून केला. Jalgaon

या घटनेनंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयित आरोपी देवानंद याला अटक केली. यावल ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी शबाबाई कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा देवानंद कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news