Nashik Bribe News : तीस हजारांची लाच घेताना सरपंच, उपसरपंच जाळ्यात | पुढारी

Nashik Bribe News : तीस हजारांची लाच घेताना सरपंच, उपसरपंच जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सोग्रस (ता. चांदवड) येथील सरपंच, उपसरपंच यांनातीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.

सरपंच भास्कर पुंडलिक गांगुर्डे (55) आणि उपसरपंच प्रकाश चंद्रभान गांगुर्डे (45) अशी त्यांची नावे आहेत. तक्रारदाराच्या मित्राने जिल्हा परिषदेअंर्गत सोग्रस येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले होते. मात्र, या बांधकामाचे बिल अद्याप मिळाले नव्हते. हे बिल काढण्यासाठी तक्रारदार यांना अधिकारपत्र प्राप्त होते. पाण्याच्या टाकीचे बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या हस्तांतरण पत्रावर सरपंच व उपसरपंच यांनी सही करून पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 50 हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 30 हजारांची लाचेची रक्कम घेण्याचे मान्य करून ती घेतली असता, त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अनिल बडगुजर, दीपक पवार, संजय ठाकरे यांच्या पथकाने कारवाई केली.

Back to top button