जळगाव : ‘एम्प्लॉई ऑफ द मंथ’ पुरस्काराने पाच पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान | पुढारी

जळगाव : 'एम्प्लॉई ऑफ द मंथ' पुरस्काराने पाच पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान

जळगाव- भुसावळ उपविभागातील पोलीस ठाण्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना एम्प्लॉई ऑफ द मंथ हा पुरस्कार देण्यात येतो.  यात पाच जणांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

भुसावळ उपविभागीय पोलीस ठाण्यात असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या गुन्ह्याची निर्मिती, मोटार वाहन कायद्यानुसार अधिकाधिक कारवाई, वरिष्ठ व स्थानिक अर्ज यांची निर्मिती अशा विविध कामांमध्ये केलेल्या गौरव म्हणून कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येतो. यावेळी एम्प्लॉई ऑफ द मंथ हा पुरस्कार डी.वाय. एस. पी कृष्णांत पिंगळे यांच्या हस्ते शहर पोलीस ठाण्यातील मो जुबेर हरून शेख बाजारपेठ चे हवालदार संदीप परदेशी, तालुका पोलीस ठाण्याच्या महिला हवालदार प्राची जोशी, नशिराबादचे तोसिफ खान, अयुब खान, वाहतूक शाखेचे हवालदार अरुण पाटील यांना मिळाला.

यावेळी पोलीस निरीक्षक गजानन पडघम पोलीस, निरीक्षक बबन जगताप, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे तसेच भुसावळ उपविभागातील सर्व अधिकारी कर्मचारी अंमलदार उपस्थित होते.

पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक चांगले व उत्कृष्ट काम करावे व गुन्ह्यांची उकल लवकरात लवकर करून नागरिकांच्या असलेल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी डी वाय एस पी कृष्णांत पिंगळे यांनी दर महिन्याला चांगले काम करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांचा एम्प्लॉई ऑफ द मंथ या पुरस्काराने त्यांच्या कामाच्या गौरव करतात.

हेही वाचा :

Back to top button