महर्षी याज्ञवल्क्यांचे व्यवस्थापन कौशल्य आदर्शव्रत : श्रीकंठानंदजी महाराज | पुढारी

महर्षी याज्ञवल्क्यांचे व्यवस्थापन कौशल्य आदर्शव्रत : श्रीकंठानंदजी महाराज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महर्षी योगीश्वर याज्ञवल्क्य यांचे व्यावहारिक व्यवस्थापन कौशल्य हे आदर्शव्रत आहे, असे काैतुकद‌्गार स्वामी श्रीकंठानंद महाराज यांनी काढले.

पंचवटीमधील शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने संस्थेला मदत करणाऱ्या मान्यवरांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. संस्थेच्या यजुर्वेद सभागृहात पार पडलेल्या सोहळ्याप्रसंगी श्रीकंठानंदजी महाराज बोलत होते. व्यासपिठावर जालना येथील ब्राह्मण योद्धा दीपक रणनवरे, धनंजय कुलकर्णी, विजया कुलकर्णी, प्रा. जयंत भातांबरेकर, बांधकाम व्यावसायिक सुहास शुक्ल, संस्था अध्यक्ष सतीश शुक्ल, उपाध्यक्ष मालती कुरुंभट्टी, कार्यवाह अॅड. भानुदास शौचे, प्रमोद मुळे, धनंजय पुजारी आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील अनेक संस्था, संघटना, मंडळे, ब्राह्मण योद्धे व नेते तसेच कार्यकर्ते यांच्या एकत्रित प्रयत्नातून श्री भगवान परशुराम आर्थिक विकास मंडळ शासनाने घोषित केले. अद्यापही अनेक मागण्या प्रलंबित असून ब्राह्मण समाजाने यापुढेही संहाटित राहावे, अशा भावना अॅड. शाैचे यांनी व्यक्त केल्या. राजश्री शौचे यांनी सुत्रसंचालन केले. राजन कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. संजय कुलकर्णी यांनी स्वागत केले. लीना चांदवडकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. शरद कुलकर्णी यांनी आभार मानले. याप्रसंगी मान्यवरांच्या ४३ सत्कारमुर्तींना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमास डॉ. राहुल सुलखे, उदय धर्माधिकारी, धनंजय पुजारी, रामकृष्ण उपासनी, सुनील भणगे, रोहिणी जोशी, अनिता कुलकर्णी, शांता जाधव व गजानन जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button