ST driver suicide : नाशिकच्या पेठ आगारातील एसटी चालकाची आत्महत्या | पुढारी

ST driver suicide : नाशिकच्या पेठ आगारातील एसटी चालकाची आत्महत्या

नाशिक (पेठ); पुढारी वृत्तसेवा

नाशिक विभागाच्या पेठ आगारातील एसटी बस चालक गहीनीनाथ अंबादास गायकवाड (वय २८, रा. मानावळी ता. आष्टी, जि. बीड) यांनी आज (दि.१९) पेठ येथे राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. (ST driver suicide)

पेठ येथील सुलभानगर मध्ये भाड्याने राहत असलेल्या घरात, गायकवाड यांनी साडीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. राज्यभर सुरू असलेला एसटी महामंडळ कर्मचारी वर्गाच्या संपामुळे aकर्मचाऱ्यांसमोर उभे राहीलेले आर्थिक संकट व आलेल्या नैराश्यातून या चालकाने आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात केली जात आहे. (ST driver suicide)

गायकवाड हे गेल्या सात ते आठ वर्षापासून पेठ आगारात नोकरी करत होते. पेठ येथे भाड्याच्या खोलीत पत्नी आणि आपल्या तीन लहान मुलींसोबत ते राहत होते. त्यांच्या निधनाने पेठ आगारातील कर्मचारी व अधिकारी वर्गात शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा :

व्हिडिओ पहा : बाळासाहेबांनी मराठी आवाज कसा बुलंद केला ?

Back to top button