Nashik Crime : वारंवारच्या दमबाजीला कंटाळून काढला काटा, वांजुळे खून प्रकरणाचा उलगडा

५ खुनानंतर सनकी पतीने जीवन संपवले
५ खुनानंतर सनकी पतीने जीवन संपवले
Published on
Updated on

वणी : पुढारी वृत्तसेवा- गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मद्यपी युवकाकडून सततची होणारी पैशांची मागणी, शिवीगाळ व दहशत याचा कायमचा बिमोड करण्यासाठी टिटवे (ता. दिंडोरी) व परिसरातील नऊ संशयितांनी त्याचा खून करीत निर्जनस्थळी प्रेत खड्डयात पुरल्याची घटना उघडकीस आली आहे. हरिश्चंद्र कचरू शेवरे ऊर्फ हऱ्या (३६, रा.वांजुळे) असे मृताचे नाव आहे. त्याचे चार दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. आठपैकी सात संशयितांना वणी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. एक संशयित अल्पवयीन आहे.

गुरुवारी (दि.१४) हरिश्चंद्र शेवरे हरवल्याची तक्रार वणी पोलिस ठाण्यात नातेवाइकांकडून देण्यात आली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता टिटवे येथे काही भांडणे झाल्याची कुणकुण लागली. परंतु, ज्या टिटवे गावात मृताबरोबर झालेल्या भांडणाची वाच्यता कुठेच होत नव्हती. गावातील कोणीच काही सांगत नव्हते. गोपनीय सूत्रांकडून अखेर एकाचे नाव पुढे आले. परंतु, संशयित घरी नव्हता. त्याचा मोबाइल नंबर मिळवून तांत्रिक तपासाला गती दिली असता चार संशयितांना दीव-दमण येथून ताब्यात घेण्यात यश आले. प्रारंभी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत अखेर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. शेवरे हा भांडणाची कुरापत काढून जबरदस्तीने पैशाची मागणी करायचा तसेच पैसे न दिल्यास शिवीगाळ व धमकी दयायचा, या जाचाला कंटाळून त्याचा काटा काढण्याचा कट रचला गेला. त्यानुसार छगन गांगोडे याने शेवरे यास दुचाकीवर बसवून टिटवे गावच्या पुलाजवळ घेऊन आला. तिथे पहिलेच दबा धरून बसलेल्या आरोपींनी लाठाकाठ्या व घातक हत्यारांनी हल्ला चढवत शेवरेचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह वारे ते तळ्याच्या पाड्यावर जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्याखालील एका ओहोळाच्या खड्ड्यात पुरण्यात आले. एकूण आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यात एक विधिसंघर्षित मुलाचा समावेश आहे. एक संशयित फरार आहे. शेवरे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची दोन दिवस पोलिस कोठडीत रवानगी झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे तपास करीत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news