Jalgaon Crime : जळगावात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार | पुढारी

Jalgaon Crime : जळगावात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने मंगळवारी (दि.12) रोजी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घराशेजारी राहणारा संशयित आरोपी योगेश तेजमल पवार हा तिच्या घरी येवून तिला सांगितले की, तुला माझ्या बायकोने घरच्या वरच्या मजल्यावर बोलावले आहे. संशयिताच्या सांगण्यावरुन पिडीत मुलगी ही घराच्या वरच्या मजल्यावर गेली. त्यावेळी संशयित आरोपी योगेश पवार याने तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने आपल्यावर अत्याचार झाल्याची माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि ए.सी. मोरे हे करीत आहे.

हेही वाचा :

Back to top button