Nashik News : अजित पवार गटाचे नितीन मोहिते समर्थकांसह वंचित’मध्ये | पुढारी

Nashik News : अजित पवार गटाचे नितीन मोहिते समर्थकांसह वंचित'मध्ये

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नितीन मोहिते यांनी कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला नाशकात मोठे भगदाड पडले आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार (दि. 12) मुंबई येथे हा प्रवेश सोहळा पार पडला. प्रसंगी नाशिक जिल्हाध्यक्ष पवन पवार,  उत्तर महाराष्ट्र महासचिव वामन गायकवाड, महानगर प्रमुख अविनाश शिंदे, महानगर सचिव बजरंग शिंदें याच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला अशी माहिती आघाडीचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिली.

नितीन मोहिते हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून गणले जातात. देवळाली मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही लढवली होती. त्यांना चांगली मतेही पडली होती. देवळाली मतदारसंघासह नाशिक शहर तसेच जिल्ह्यात त्यांच्या नावाचे मोठे वलय आहे. त्यांच्या तसेच त्यांच्या समर्थकांच्या प्रवेशाने वंचित बहुजन आघाडीला मोठे बळ मिळेल असेही शिंदे यांनी पुढे नमूद केले. वंचित बहुजन आघाडी नाशिक महानगर तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बळकट होत आहे. भाजपाला पर्याय म्हणून अनेक जण वंचित बहुजन आघाडीकडे मोठ्या आशेने बघतात. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी निश्चितच काहीतरी करिष्मा करेल असा लोकांना विश्वास वाटत आहे. विविध पक्षातील मान्यवर नेते आघाडीशी संपर्क साधून असून ते सुद्धा लवकरच पक्षात प्रवेश करतील, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

सामजिक कार्यकर्ते शंकर जाधव, जलालपुर सरपंच अनिल जाधव, सामजिक कार्यकर्ते अरुण काशीद, मराठा समाजाचे नेते तुकाराम मोजाड, आनंदा ढेरिंगे, आदिवासीं सामज्याचे नेते किरण वायकांडे व सामजिक कार्यकर्ते शरद साळवे, धोंडीराम गलांडे, मुकेश रामराजे, अरुण रोकडे, सरपंच शाम गारे, सुरज गांगुर्डे, सुनील साळवे, उत्तम साळवे, चाणसी गामपंचायतचे सरपंच शरद धोंगडे, सागर भालेराव, विलास जाधव, अमित जाधव, बाळासाहेब जाधव, भाऊराव साळवे, राहुल जाधव, बाळासाहेब पगारे, अखिलेश जाधव, .सोमनाथ कराटे, जगन गुळवे, सिताराम धुमाळ, विजय गायकवाड, गौतम पगारे, संतोष बेंडकुळे, सोमनाथ दिवे, भाऊसाहेब दिवे, निखिल जाधव, आकाश जाधव, सुरेश जाधव, रामदास जाधव, सुरेश दोंदे आदी मान्यवरांनी प्रवेश केला. आजपासून पक्षी वाढीसाठी काम करणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button