Onion Price Drops : कांद्याचे भाव तेराशे रुपयांनी घसरले, निर्यात बंदीचा फटका | पुढारी

Onion Price Drops : कांद्याचे भाव तेराशे रुपयांनी घसरले, निर्यात बंदीचा फटका

जळगाव : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांद्याला 2364 रुपये भाव मिळाला. 50 गाड्या कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आला होता. निर्यात बंदीमुळे कांदा भावावर परिणाम होऊन तब्बल 1264 रुपयांनी कांद्याचे दर घसरले आहे. (Onion Price Drops)

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी विक्री सुरू आहे. आज बहुतांशी कांदा खरेदी बंद असताना चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा खरेदी सुरू होती. गेल्या शुक्रवारी कांद्याला 36 रुपये भाव मिळाला होता. आज दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी बाजार समितीमध्ये कांदा लिलावाला सुरुवात झाली असता पन्नास गाड्यांची आवक बाजार समितीमध्ये दुपारपर्यंत झाली. कांद्याल 2364 रुपये इतका भाव मिळाला. शुक्रवार पेक्षा 1236 रुपये दर सोमवारी शेतकऱ्यांना कमी मिळाला. इकडे कांद्याचे दर घसरत असताना दुसरीकडे केंद्राने कांद्यावर निर्यात बंदी लादल्याने कांद्याचे दर अजून खाली जाणार असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. निर्यात बंदीच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. (Onion Price Drops )

याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, केंद्र सरकारने अचानक निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याचे दर घसरलेले आहे. दुसरीकडे कांदा मार्केट बंद असताना आपण व्यापाऱ्यांची चर्चा करून कांदा खरेदी सुरू ठेवलेली आहे. – कपिल पाटील,  अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती

हेही वाचा :

Back to top button