Sharad Pawar in Chandwad : दिल्लीची आज झोप उडाली असेल ; शरद पवार यांचा केंद्र सरकारवर निशाणा | पुढारी

Sharad Pawar in Chandwad : दिल्लीची आज झोप उडाली असेल ; शरद पवार यांचा केंद्र सरकारवर निशाणा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क- कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संतापला आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात ठिकठिकाणी आंदोलने, रास्तारोको करण्यास सुरुवात केली आहे. नाशिकच्या चांदवडमध्ये आज राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या उपस्थितीत रास्तारोको करण्यात आला. (Sharad Pawar in Chandwad)

शरद पवार यांनी स्वत: या रास्तारोकोत सहभाग घेतला व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पवार म्हणाले, केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या  प्रश्नांची बिलकूल जाण नाही. केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या पीकांना योग्य भाव मिळत नाही. कांद्याला योग्य भाव मिळाला पाहीजे. अनेकजण म्हणतात कांदा महागला तर खाना मुश्किल होगा, मग तसे असेल तर खाऊ नका असा सल्ला पवारांनी दिला. यावेळी केंद्र सरकारवर पवारांनी चांगलाच निशाणा साधला.

कांदा निर्यातबंदीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांचा संसार उद्धस्त करणारा निर्णय आहे. अशाप्रकारे रास्तारोको करुन आपल्याला लोकांना त्रास देण्याचा उद्देश नाही, मात्र रास्तारोको केल्याशिवाय दिल्लीला शेतकऱ्यांचे मुद्दे कळत नाही. आजच्या आंदोलनाची कल्पना दिल्लीला आहे. त्यामुळे आजच्या आंदोलनाचा आवाज हा दिल्लीपर्यंत पोहचला असणार आणि दिल्लीची झोप उडाली असणार असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे शेतीची अर्थव्यवस्था संकटात आली आहे. नाशिकच्या शेतकऱ्यांची व्यथा संसदेत मांडली जाईल असा विश्वास त्यांनी शेतककऱ्यांना दिला.

तोवर गप्प बसणार नाही…

केंद्राच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी व कांदा व्यापारी अडचणीत आहेत. शेतकऱ्यांसाठी योग्य धोरण आखलं गेलच पाहीजे. शेतकरी सर्व बाजूंनी अडचणीत आलाय. उस उत्पादकांनाही चुकीच्या धोरणाचा फटका बसला आहे. त्यामुळे कांद्याला योग्य भाव मिळत नाही तोवर गप्प बसणार नाही असा इशारा पवारांनी दिला.

 

हेही वाचा :

Back to top button