Nashik Accident : नाशिक-पुणे महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार | पुढारी

Nashik Accident : नाशिक-पुणे महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

सिन्नर : नाशिक – पुणे महामार्गावर हाबेवाडी शिवारात ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.६) पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. ईश्वरी नाना गावंडे (२६, रा. तांभोळ ता. अकोले) व प्रवीण सोमनाथ पोकळे (२०, रा. पिंपळगाव निपाणी ता. अकोले) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

प्रवीण व ईश्वरी हे दुचाकीने (एम. एच. १७, बी. वाय. ५८१६) वरून संगमनेरकडून सिन्नरकडे येत होते. हाबेवाडी शिवारातील भारत पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून आलेल्या ट्रकने (एम. एच. ४१, ए. यू. ७८१४) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. जबर मार लागल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी समाधान नाना गावंडे (रा. तांभोळ) यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक सलीम शेख (रा. मालेगाव) याच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक वाजे करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button