Nashik News : गर्भपात केल्या प्रकरणी पत्नीसह सात साथीदारांविरुद्ध गुन्हा | पुढारी

Nashik News : गर्भपात केल्या प्रकरणी पत्नीसह सात साथीदारांविरुद्ध गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर पत्नीने नातलगांच्या मदतीने गर्भपात केल्याचा आरोप पतीने केला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार म्हसरूळ पोलिस ठाण्यात महिलेसह तिच्या नातलगांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीच्या फिर्यादीनुसार, २०१८मध्ये पत्नीने गर्भपात केला आहे.

म्हसरूळ परिसरात राहणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीने न्यायालयात २०२१ मध्ये दाखल केलेल्या फौजदारी चौकशी अर्जानुसार संशयित महिलेसह सात साथीदारांविरुद्ध गर्भपाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित महिलेचा २०१६ साली तक्रारदारासोबत आंतरधर्मीय विवाह झाला. मात्र, २०१८मध्ये तीन ते चार महिन्यांची गर्भवती असताना तिने नातलगांच्या मदतीने गर्भपात केला. तिला दुसरे लग्न करायचे असल्याने हे कृत्य केल्याचा दावा तक्रारीत नमूद आहे. तर संशयित महिलेनेही २०१८मध्ये पतीविरुद्ध छळाचा गुन्हा दाखल केला होता.

दोघांचेही प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच, पत्नीने गर्भपात केल्याचा अर्ज पतीने सन २०२१मध्ये न्यायालयात नोंदविला होता. या अर्जाची चौकशी सप्टेंबर २०२३मध्ये पूर्ण झाल्यावर न्यायालयाने पोलिसांना त्यासंदर्भातील सखोल तपासाचे आदेश दिले. गर्भपाताचा गुन्हा दाखल असलेली महिला नाशिक पोलिस दलात कार्यरत होती. मात्र तिने आंतरजिल्हा बदली केली होती. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button