नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला ठाकरे गटाचा 'आक्रोश' | पुढारी

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला ठाकरे गटाचा 'आक्रोश'

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देताना हेक्टरी ५० हजार रुपये देण्यात यावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सोमवारी (दि.४) जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये शेकडो शेतकरी बैलगाड्या आणि ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले.

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाकरे गटातर्फे मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना यावेळी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी २५ बैलगाड्यांसह ट्रॅक्टर घेऊन मोर्चात शेतकऱ्यांनी लावलेल्या हजेरीमुळे साऱ्यांचेच लक्ष वेधले. मोर्चामुळे सीबीएस चाैक, अशोकस्तंभ, एमजी रोड आदी भागात मोठी वाहतूक कोंडी झाली.

शालिमार येथील शिवसेना भवनपासून प्रारंभ झालेला मोर्चा नेहरु गार्डन, रेडक्राॅस सिग्नल, एमजी रोड, मेहेर सिग्नलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. मोर्चामध्ये पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, उपनेते सुनिल बागुल, माजी आमदार अनिल कदम, निर्मला गावित व योगेश घोलप, कुणाल दराडे, देवानंद बिरारी यांच्यासह अन्य पदाधिकारी, शिव सैनिक तसेच शेतकरी सहभागी झाले.

प्रमुख मागण्या…

-दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी

-जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना करावी

-जनावरांना खुटयावर चारा उपलब्ध करून द्यावा

-पिक विम्यातील जाचक अटी रद्द करा

-सरसकट पिकविम्याची रक्कम बाधित शेतकऱ्यांना मिळावी

-खरीप व रब्बी हंगामातील पिकांना लागू असलेला विमा सरसकट द्यावा

-कुठलेही निकष न पाहता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी

च्या निदर्शनास आणून दिले.

हेही वाचा :

Back to top button