Nashik News : भाजप सरकारविरोधात जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा

Nashik News : भाजप सरकारविरोधात जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा

दिंडोरी, पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णत्व उद्ध्वस्त झाला आहे. शेतीचे दुप्पट उत्पन्न देण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते. मात्र, आज शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्याला संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हिवाळी अधिवेशनात सरकारवर दबाव आणू, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले. Nashik News

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज (दि.१) दिंडोरीतून रणशिंग फुंकले. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य ट्रॅक्टर रॅली काढत शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. Nashik News

दिंडोरी येथील कादवा पेट्रोल पंप येथून जयंत पाटील यांच्यासह आमदार सुनील भुसारा, दिंडोरी लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, गोकुळ पिंगळे, गजानन शेलार आदीसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. जयंत पाटील हे स्वतः ट्रॅक्टर चालवत अग्रभागी होते. कर्जमाफी झालीच पाहिजे, नुकसान भरपाई द्या. भाजप सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. यावेळी तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर मोर्चाची सांगता सभा झाली.

यावेळी राष्ट्रवादी लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रेय पाटील यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, आमदार सुनील भुसारा, माजी आमदार शिरीष कोतवाल, नितीन भोसले, साहेबराव पाटील, तालुकाध्यक्ष भास्कर भगरे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पाटील यांची भाषणे झाली.

यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, दीपिका चव्हाण, गोकुळ पिंगळे, तिलोत्तमा पाटील, प्रवीण जाधव, राष्ट्रवादी युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हाध्यक्ष शाम हिरे, शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पिंगळ, माकपचे इंद्रजित गावित, कादवाचे व्हा. चेअरमन शिवाजी बस्ते, सर्व संचालक, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष संगीता ढगे, तालुकाध्यक्ष शैला उफाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कादवा चे संचालक बाळासाहेब जाधव यांनी जयंत पाटील यांचे स्वागत केले. दिंडोरी शहराध्यक्ष नरेश देशमुख यांनी आभार मानले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news