ललित पाटील प्रकरणात सरकारचा हात असल्याचे सगळ्यांना माहिती :  जयंत पाटील

जयंत पाटील
जयंत पाटील

जळगाव- ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये सरकारमधील मंत्री सहभागी असू शकतात. गुन्हेगारांना रुग्णालयात नेऊन ठेवण्यात, रुग्णालयातून बाहेर काढण्यात सरकार मध्ये असणाऱ्यांचेच हात आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. याप्रकरणी स्वतंत्रपणे चौकशी झाली पाहिजे अशी मागणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

नाशिक येथे कोट्यवधी रुपयांचे ड्रग सापडले. या प्रकरणात ललित पाटील अटकेत आहे. या प्रकरणात जळगाव-चाळीसगाव कनेक्शन उघड झाले. तसेच याप्रकरणात सरकारमधील मंत्र्यांचा समावेश असल्याची शक्यता पाटील यांनी बोलून दाखवली. मात्र सरकार सर्व गुलदस्त्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. जळगाव कनेक्शन यावरन पांघरून घालण्याचा प्रयत्न करावा लागतो मात्र ते पांघरून किती वेळा घालणार हे सर्वांना माहिती आहे. काय झाले कसे झाले यासाठी सरकारने स्वतंत्र चौकशी केली पाहिजे असे जयंत पाटील म्हणाले.

यावर खडसे बोलताना म्हणाले की, जळगाव-चाळीसगाव कनेक्शन उघड झाले असले तरी मंत्र्यांचा कार्यकर्त्यांचा यात सहभाग आहे की नाही यासाठी  दीड वर्षाचे मंत्र्यांचे व कार्यकर्त्यांचे फोन तपासले जावे. त्यांच्या संपर्क झाला आहे की नाही हे पाहिले पाहिजे. माझी खात्री आहे की, त्यांचा संपर्क  झालेला आहे.  नाहीतर ससून मध्ये व जे जे हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ मंत्र्यांचे शिफारशी शिवाय ते कसे दाखल होऊ शकतात व कसे राहतात. त्यामुळे यामध्ये थेट मेडिकल मंत्री यांचा सहभाग असेल किंवा होता तो तपासा. तो तपासायचा असेल तर त्यांचे फोन नंबर तपासावे म्हणजे सत्य बाहेर येईल आणि जर कोणाचा सहभाग नसेल तर आम्हालाही आनंद आहे. नाशिक जळगाव चाळीसगाव हे कनेक्शन सिद्ध झाले आहे. चाळीसगावात ललित पाटील तीन दिवस कोणाकडे राहिला होता. हे जाहीर करावे, चाळीसगावात मोठ्या प्रमाणात ड्रग्स मिळाले सरकारने जाहीर करावे. गुलदस्त्यात का ठेवत आहे. त्यांची खुली चौकशी करावी अशी मागणी यावेळी खडसे यांनी केली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news