पिंपळनेर : साक्री तालुक्यातील प्रतापपूर येथील 79 वर्षीय कस्तुराबाई फकिरा गांगुर्डे यांना सीट्स चेकइन कंपनी लिमिटेड या कंपनीने गुंतवणुकीचे आमिष दाखवून 5 लाख 100 रुपयांची फसवणूक केली.
कस्तुराबाईंना कंपनीच्या जाहिराती आणि लेखी आश्वासनांमुळे विश्वास बसला आणि त्यांनी 6 वर्षांच्या मुदतीसाठी कंपनीत गुंतवणूक केली. मात्र, गुंतवणुकीची मुदत पूर्ण झाल्यानंतरही त्यांना पैसे मिळाले नाहीत.
कस्तुराबाईंनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी ओमप्रकाश वसंतलाल गोयकर, प्रकाश गणपत उतेकर, नटराजन व्यंकटरामण, नारायण शिवराम कोटणीस (सर्व रा.वडाळा, मुंबई) आणि देविदास दौलत महाले (रा.पिंपळनेर ता.साक्री) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.