

जळगाव : तालुक्यातील कंडारी गावातील रहिवासी महेंद्र महादेव परदेशी यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने चार लाख पाच हजार ६२५ रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र परदेशी हे किराणा दुकान चालवतात. ते 17 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या काळात बाहेरगावी गेले होते. या काळात घरात कोणीही नव्हते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कडी कोडा तोडून घरात प्रवेश केला.
घरी ठेवलेल्या कपाटाच्या तिजोरीमधील दीड लाख रुपये रोख, दीड लाखाचे चार ग्रॅमचे दोन सोन्याचे टोंगल, 11250 रुपयाचे तीन ग्रॅमची सोन्याची पोत, 75 हजार रुपयांचे वीस ग्रॅमचे पट्टी पोत, 13,125 रुपयांच्या कानातील चाफे आणि सहा हजार 250 रुपयांचे देवघरातील चांदीचे सहा देव असे एकूण चार लाख पाच हजार ६२५ रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. महेंद्र परदेशी यांनी याप्रकरणी नशिराबाद पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा :