नाशिक : आईच्या फ्लॅटवर मुलगा व सुनेचा कब्जा, गुन्हा दाखल | पुढारी

नाशिक : आईच्या फ्लॅटवर मुलगा व सुनेचा कब्जा, गुन्हा दाखल

नाशिक : आईच्या फ्लॅटवर विनापरवानगी मुलगा व सुनेने कब्जा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रत्ना हरिचंद्र भादु (६५, रा. कॉलेजरोड) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात मुलगा व सुनेविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

रत्ना भादु यांच्या फिर्यादीनुसार, मुलगा महिपाल हरिचंद्र भादू व सुन प्रिती भादु यांनी शुक्रवारी (दि.१०) सकाळी १० वाजता फ्लॅटचा ताबा घेतला. पंपिग स्टेशन येथे भादु यांच्या मालकीचा फ्लॅट असून त्यांचा मुलगा व सुनेने कोणताही अधिकार किंवा हक्क नसताना आईच्या परवानगीशिवाय सुरक्षारक्षकाकडून फ्लॅटची चावी घेतली. त्यानंतर फ्लॅटमध्ये स्वत:चे सामान ठेवून फ्लॅटचा कब्जा केला. याप्रकरणी गंगापूर पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button