Nashik Crime : दारूच्या नशेत पत्नीचा खून, मारेकरी पतीला 12 तासांच्या आत अटक | पुढारी

Nashik Crime : दारूच्या नशेत पत्नीचा खून, मारेकरी पतीला 12 तासांच्या आत अटक

इगतपुरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे पती-पत्नीच्या किरकोळ वादातून पतीने लोखंडी पहार डोक्यात मारून पत्नीची हत्या केली. पोलिसांनी १२ तासांच्या आत आरोपीला शिताफीने अटक केली.

याबाबत माहिती अशी की, घोटी खुर्द येथे मंगळवारी २१ नोव्हेंबरला मध्यरात्री मुकुंदा हरी वाघ व त्याची पत्नी सुमित्रा (३८) यांच्यात वाद झाले. या वादातून दारूच्या नशेत असणाऱ्या मुकुंदाने रागाच्या भरात लोखंडी पहारीने सुमित्राच्या डोक्यात जोरदार घाव घातले. ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली बघून मुकुंदा वाघ याने तत्काळ पळ काढला. पोलिसपाटील यांच्या खबरीवरून वाडीवऱ्हे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा आढावा घेतला. तपासाची चक्र फिरवत संशयित आरोपी मुकुंदा वाघ यास १२ तासांत घोटी खुर्दजवळील गावमाथा येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक केली. वाडीवऱ्हेचे सहायक पोलिस निरीक्षक समीर बारवकर, उपनिरीक्षक राज पाटील, प्रवीण काकड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा :

Back to top button