

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा- दिवाळीनंतरही शहर व उपनगरांमध्ये अपघाताचे सत्र सुरुच आहे. उपनगर येथे बांधकाम सुरू असताना सोमवारी सकाळी जुने छत कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मधुकर यादवराव बोंबडे (५९, प्लॅट नं. ३०३, श्रेयस पार्क, अशोका शाळेजवळ, चांदसी) असे असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जेलरोड, उपनगर येथील प्रियंका बंगला येथे अनमोल कैलास केडिया यांच्या बंगल्याचे बांधकाम सुरु आहे. मधुकर बोंबडे हे सोमवार दि. २० नोव्हेंबरला अनमोल केडिया यांच्या बांधकामाच्या ठिकाणी कामासाठी गेले होते. काम सुरू असताना सकाळी अकराच्या सुमारास जुन्या घराचे लाकडी छत अचानक बोबडे यांच्या अंगावर पडले. त्यात मधुकर बोंबडे यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. त्यांना त्यांचा भाचा बलभीम शेळके याने तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. उपनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी नोंद झाली आहे.
हेही वाचा :