नाशिकमधील दहशत निर्माण करणारी महिला तडीपार

नाशिकमधील दहशत निर्माण करणारी महिला तडीपार
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – सर्वसामान्यांची फसवणूक करणे, आपल्या साथीदारांच्या मदतीने मारहाण करणे, अनधिकृतपणे घरात घुसणे, दमदाटी करणे, शिवीगाळ करणे, विनयभंग, अब्रूनुकसानीची धमकी देऊन खंडणी मागणे, दहशत निर्माण करून भीती पसरविणाऱ्या महिलेला उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दपार करण्यात आले.

भारती साहेबराव आहिरे (४५, रा. भारती रो हाउस नं. ०२, जय भवानी रोड, नाशिकरोड) असे या महिलेचे नाव असून, गेल्या काही दिवसांपासून तिच्या या कारनाम्यांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. शहरात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करण्याचा तिच्याकडून सातत्याने प्रयत्न केला जात असल्याने पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्यावर हद्दपारीची कारवाई केली आहे. शहरातील जनजीवन विस्कळीत करणाऱ्या व समाज स्वास्थ्य बिघडवणाऱ्या गुन्हेगारांच्या गुन्ह्यांचा अभिलेख संकलित करण्याचे कामकाज सुरू असून, त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार तडीपार व एमपीडीए कायद्याच्या तरतुदीनुसार प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत चालू वर्षात परिमंडळ २ हद्दीतून ६१ जणांना तडीपार केले आहे, तर परिमंडळ २ हद्दीत हद्दपार आदेशाचे उल्लंघन करताना मिळून आले म्हणून २० संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत. हद्दपार संशयितांचा वेळोवेळी तपास करून ते शहर व जिल्ह्यात आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news