जळगाव : मंत्री गुलाबराव पाटील यांना बंधूशोक, कैलास पाटील यांचे निधन | पुढारी

जळगाव : मंत्री गुलाबराव पाटील यांना बंधूशोक, कैलास पाटील यांचे निधन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे लहान बंधू कैलास पाटील यांचे (दि. 8) रोजी पहाटे पाळधी येथे निधन झाले.  त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

कैलास रघुनाथ पाटील यांचे (दि. 8) रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अकस्मात निधन झाले. त्यांच्यावर पाळधी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.  कैलासजी यांच्या अकाली मृत्यूमुळे पाटील कुटुंबावर वज्राघात झाला असून परिसरातून शोक संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. तर ना. गुलाबराव पाटील यांचे समर्थकही पाळधी येथे अंत्यसंस्काराप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button