जळगाव : जिल्ह्यात अकरा ग्रामपंचायती बिनविरोध, लढतीचे चित्र स्पष्ट

जळगाव : जिल्ह्यात अकरा ग्रामपंचायती बिनविरोध, लढतीचे चित्र स्पष्ट
Published on
Updated on

जळगाव : जिल्ह्यात होणाऱ्या 137 सार्वत्रिक व 79 ग्रामपंचायत रिक्त पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत 25 तारखेला माघारीनंतर   जिल्ह्यातील ग्रामपंचायती व पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

यामध्ये चाळीसगाव तालुका, पातोंडा, अमळनेर तालुका, दोधवद, चोपडा तालुका, तावसे खुर्द, यावल तालुका, गिरडगाव, पारोळा तालुक्यातील खोलसर , दगडी सबगव्हाण, भडगाव तालुक्यातील लोण पासर्डी, तर जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द जामोद व पळसोद या ग्रामपंचायतींचा बिनविरोध मध्ये समावेश आहे.

जिल्ह्यात होणाऱ्या 137 सार्वत्रिक व 79 ग्रामपंचायत येथील रिक्त पदासाठी निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे. यात सरपंच पदासाठी 910 तर ग्रामपंचायत सदस्यासाठी 4533 अर्ज दाखल करण्यात आलेले होते. या अर्जांची छाननी दि. 25 रोजी झाली आहे. यानंतर जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या आहेत.

जळगाव तालुक्यातील 15 पंधरापैकी खेडी खुर्द जामोद व पळसोद तिन्ही ग्रामपंचायत सरपंच व इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने सरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे. पळसोद ग्रामपंचायत सलग दुसऱ्यांदा बिनविरोध झाली आहे. येथे राधाबाई पाटील या सरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे. खेडी खुर्द येथे तेजस चौधरी सरपंच पदासाठी बिनविरोध झाले आहे. पळसोद जामोद या दोन्ही ग्रामपंचायती बिनविरोध झाले आहेत. 12 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 42 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर सदस्य पदासाठी 206 उमेदवार जळगाव तालुक्यात निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

अमळनेर तालुक्यातील दोधवद येथे सरपंच कमलाबाई शेंगदाणे यांच्यासह सात जण बिनविरोध आले आहेत. पिंपळे खुर्द येथे सरपंच पद वर्ष युवराज पाटील यांचे पाच सदस्य बिनविरोध झाले आहेत. तेथे दोन जागांवर निवडणूक होणार आहे चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथे लोकनियुक्त सरपंच म्हणून काशिनाथ सिताराम शिरसाठ व 17 सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. माळशेवगे ग्रामपंचायतचे नऊ सदस्य बिनविरोध झाले आहेत. चोपडा तालुक्यातील तावसे खुर्द रेखा किशोर चौधरी सरपंच पदी तर नऊ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

यावल तालुक्यातील गिरडगाव ग्रामपंचायत येथील सरपंच म्हणून आशा हुसेन तडवी याच्या सहसा सदस्य दिन विरोध निवड झाल्या आहेत तर गाडऱ्या नऊ सदस्य बिनविरोध निवडून आले आहे. सरपंच पदासाठी पाच उमेदवार रिंगणात आहे. भुसावळ तालुक्यात सात सरपंच पदासाठी 28 उमेदवार रिंगणात असून 67 सदस्यांपैकी सात जागा बिनविरोध झाले आहे. तर 60 सदस्य पदासाठी 167 उमेदवार रिंगणात आहे तर वेल्हाळे गावातील सरपंच पदाचा एक अर्ज बाद झालेला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत व 3 पोटनिवडणुकी साठी 62 उमेदवार रिंगणात आहे. लोकनियुक्त सरपंच पदासाठी 12 उमेदवार आहेत.  रावेर तालुक्यात लोकनियुक्त सरपंच पदासाठी 40 तर 125 सदस्य पदासाठी 252 उमेदवार रिंगणात आहे. लोकनियुक्त सरपंच पदास साठी दिसणार आहे. बोदवड तालुक्यात पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 101 सरपंच पदासाठी 27 उमेदवार रिंगणात आहे. पारोळा 11 भडगाव ८ अंमळनेर 14 चाळीसगाव 12 भुसावळ 7 पाचोरा 4 एरंडोल 7 रावेर 13 जामनेर १७ चोपडा 22 जळगाव 15 बोदवड 5 मुक्ताईनगर 4 यावल 10 धरणगाव 18 असे एकूण 167 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक होणार आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news