Jalgaon Crime : भुसावळ, अमळनेरातील गुन्हेगार कारागृहात स्थानबद्ध | पुढारी

Jalgaon Crime : भुसावळ, अमळनेरातील गुन्हेगार कारागृहात स्थानबद्ध

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; जिल्ह्यातील भुसावळ व अमळनेर शहरातील रहिवासी असलेल्या अजय अवरमोल व तन्वीर शेख मुक्तार या दोघा कुख्यात गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यांना मुंबई व ठाणे येथील कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. ही कारवाई (दि. 20) रोजी करण्यात आली आहे.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही अनुचित घडू नये यासाठी ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये भुसावळ येथील अजय उर्फ सोनू मोहन अवसरमल (वय 22) याच्यावर पंधरा गुन्हे दाखल आहेत. त्यास एम पी डी एफ नुसार स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी करण्यात आले. तर अमळनेर शहरातील कायदा व सुव्यवस्थाच्या दृष्टीने, एकावर एमपीडीए ची कारवाई करण्यात आली आहे, तन्वीर शेख मुक्तार (रा. अमळनेर) याच्यावर 13 गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर शहरात तसेच समाजात अशांतता पसरवणे याबरोबरच इतर समाजास बाधा निर्माण होईल असे कृत्य करणे असे विविध गुन्हे त्याच्यावर दाखल होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यास स्थानबद्ध करण्याचे नुकतेच आदेश दिले होते. त्याला ठाणे येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

अमळनेर पोलीस निरीक्षक विजय शिंदे व अमळनेरच्या सर्व पोलीस टीमने हा प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता व त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी एम पी डी ए अंतर्गत कारवाईचे आदेश नुकतेच पारित केले आहे.

हेह वाचा :

Back to top button