Madhya Pradesh Election : निवडणूक मध्यप्रदेशची, तपासणी नाके महाराष्ट्रात  | पुढारी

Madhya Pradesh Election : निवडणूक मध्यप्रदेशची, तपासणी नाके महाराष्ट्रात 

धुळे : पुढारी वृत्तसेवा; मध्य प्रदेश मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या हद्दीत सहा ठिकाणी विशेष तपासणी नाके सुरू केले असल्याची माहिती आज पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे. (Madhya Pradesh Election)

धुळे जिल्ह्याला लागून मध्य प्रदेशाची सीमा आहे. या सीमावर्ती भागामध्ये मध्य प्रदेशातील निवडणुकीचा प्रभाव पडू शकतो ,ही शक्यता लक्षात घेऊन धुळे जिल्हा पोलीस विभाग अलर्ट झाला आहे. या अंतर्गतच मध्यप्रदेशच्या सीमेवर महाराष्ट्राच्या हद्दीत जिल्हा पोलिसांनी सहा ठिकाणी विशेष तपासणी नाके सुरू केले आहे. ह्या तपासणी नाक्यावर एक पोलीस अधिकारी आणि चार कर्मचारी हे 24 तास नेमणुकीस राहणार आहे. या तपासणी नाक्यांच्या माध्यमातून महामार्गावरून जाणारी संशयित वाहने तपासण्यात येणार आहे. मद्य तस्करी तसेच अन्य गैर कारभार रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

जिल्हा पोलीस आणि तपासणी नाक्यावरील अधिकारी हे मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील पोलिसांच्या देखील संपर्कात राहणार आहे. या संपर्कातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती देखील बारकुंड यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button