Jalgaon News : मजाक मस्करीतून वाद, डोक्यात काठी मारताच एकाचा मृत्यू | पुढारी

Jalgaon News : मजाक मस्करीतून वाद, डोक्यात काठी मारताच एकाचा मृत्यू

जळगांव : पुढारी वृत्तसेवा; भुसावळ तालक्यातील वरणगाव फॅक्टरीच्या आवारात वडापाव खात असतांना दोघांमध्ये मजाक मस्करीतून झालेल्या वादात एकाने डोक्यात काठी मारताचा ५८ वर्षीय प्रौढाचा जागेवरच मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना रविवारी (दि. १५) घडली. याप्रकरणी एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. (Jalgaon News)

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सिध्देश्वर नगरात राहणारे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरीला असलेलें प्रमोद महाजन हे राहत होते. रविवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वरणगाव फॅक्टरी आवारातील सुशील नगर सर्कल जवळ मित्रा सोबत दिपकसिंग (वय-५० रा. वरणगाव फॅक्टरी) याच्या सोबत वडापाव खात बसले होते. या दोघांमध्ये गप्पा सुरू असतांना मजाक मस्करीला सुरूवात झाली त्यानंतर दिपकसिंगने जवळ असलेली काठी प्रमोद महाजन यांच्या कपाळावर मारली. यात काठीचा जोराचा फटका डोक्यावर मारताच यातच प्रमोद महाजन याचा जागेवर मृत्यू झाला.

दरम्यान, परिसरातील उभे असलेल्या नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर प्रमोद महाजन यांना तातडीने वरणगाव ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. या तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. वरणगाव पोलीसांनी संशयित दिपक सिंग याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घटना घडल्यानंतर डीवायएसी राजकुमार शिंदे, वरणगाव पोलीस ठाण्यात सपोनि आशिष अडसुळ यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा :

Back to top button