

पिंपळनेर (जि. धुळे) पुढारी वृत्तसेवा ; माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने त्यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. यानिमित्त मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.राजा दिक्षीत यांनी शब्द कोषाचे लोकशाहीकरण करणारे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री यांचे पिंपळनेर गांधी चौकातील बालपणातील जुन्या वास्तूला भेट दिली.
यावेळी प्रा.डॉ.राजा दिक्षीत म्हणाले, "आमच्यासाठी हेच तिर्थक्षेत्र आहे. या वास्तूला इतिहासाचा स्पर्श झाला आहे. तर्कतीर्थांचे बालपण, त्यांचे शिक्षण, त्यांचे विचार या सर्व गोष्टी या वास्तूमध्ये सामावल्या आहेत. त्यामुळे या वास्तूला भेट देऊन मी खूप धन्य झालो."
दिक्षीत यांनी तर्कतीर्थांच्या जुन्या घरास भेट दिल्यानंतर त्यांचे बालपणातील जुनी जिल्हा परिषद मराठी शाळा आणि लोकमान्य टिळक ग्रंथालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी मराठी शाळा व वाचनालयाला विश्वकोष खंडाच्या तीन प्रती भेट दिल्या.
यावेळी गांधी चौकात छोटेखानी सभेच्या अध्यक्षस्थानी लो.टिळक वाचनालयाचे अध्यक्ष मकरंद वैद्य होते. तर व्यासपीठावर शब्दकोश मंडळाचे संतोष गोडाम, रविंद्र घोडराज, वाचनालयाचे सचिव किशोर विसपुते, डॉ.विवेकानंद शिंदे ,डॉ.ई.बी.कोरडे, कोरडे, डॉ.भूपाल देशमुख, रघुनाथ दशपुते आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा.डॉ राजा दिक्षीत म्हणाले, मराठी विश्वकोश मंडळाचे काम करणे अतिशय जिकरीचे असून हे काम 34 वर्ष शब्दकोशाचे काम करणारे तर्कतिर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्याकडून प्रेरणा घेतली.यात बालकोश,कुमार कोश व ऑलिंपिक कोशाचे काम करणार असून ते गुणवत्तापूर्वक व अध्यायावत करीत आहोत.असे सांगून कार्याची प्रशंसा केली.यावेळी डॉ.राजा दिक्षीत यांनी मराठी शाळा व वाचनालयाला विश्वकोष खंडाच्या तीन प्रती भेट दिल्या
या कार्यक्रमाला सुरेंद्रराव मराठे, डॉ.ई.बी.कोरडे, किशोर विसपुते, डॉ.विवेकानंद शिंदे, प्राचार्य के.डी.कदम, डॉ.बी.सी.मोरे, प्रा.योगेश नांद्रे, डॉ भुपाल देशमुख, राजेंद्र जोशी, वसंतराव चौधरी, रिखबचंद जैन, वाचनालयाचे ग्रंथपाल भूषण कोठावदे, प्रा.बी.एस.कोठावदे, प्रदीप भामरे, हभप भालचंद्र दुसाणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.डी.पाटील यांनी तर आभार भुषण कोठावदे यांनी मानले.
हेही वाचा :